nocopy

Saturday, May 9, 2020

आंबा कलाकंद

घरात एकच आंबा उरला होता त्याचे काहीतरी प्रयोग करावे असे सारखे मनात येत होते आंबा खीर,शिरा ह्यासाठी सुकामेवा आणि रवा नव्हता आंबा दलिया शिरा/खीर करावी असे पण वाटत होते गूगल केले तर त्याच्या ठिकठिकाणच्या पाककृती वाचून एकतर आंब्याचा रव्याचा शिरा किंवा साधा दलिया शिरा/खीर अशी माहिती मिळत होती आणि इंग्लिश मध्ये काही ठिकाणी आंबा दलिया खीर/शिरा माहिती मिळाली ती  वाचून तेवढे सगळे करण्याचा पेशन्स नव्हता स्वतःहून try करायचे म्हणाले तर मागच्यासारखे फसायला नको म्हणून हात चालत नव्हते आंबा तसाच खाऊन संपवला जाणार बहुधा अशी तयारी केली होती अशातच दूध नासले
आता त्याचे दही/पनीर/कलाकंद ह्यातले  काहीतरी करणे भाग होते कलाकंद मागच्याच आठवड्यात झाला होता
तरी पण बनवायला सोपा (वेळखाऊ असला तरी ) तोच एक option होता
थोडेसे कंटाळूनच दुधातले पाणी काढून टाकले फक्त घट्ट नासकवणी दूध ठेवले गॅस वर साखर आणि वेलदोड्याचे दोन दाणे /पाकळ्या घातल्या आणि ढवळायला लागले अचानकच त्या आंब्याचा विचार आला आणि करून पाहूया म्हटले मग काय एकीकडे गॅस वर कलाकंद मंद आचेवर ठेवलाच होता एकीकडे तो मध्यम आकाराचा आंबा पिळून त्याचा रस काढला थोडासा चमच्याने सारखा केला आणि गॅसवर ठेवलेल्या कलाकंदात  दिला घालून साधारण १५-२० मिनटे आटवले आणि झाला मँगो कलाकंद तयार !
खाताना थोडीशी बर्फीसारखी चव लागली आज गरम खाल्ला उद्या फ्रीज्ड version खाऊन बघू
हे बनवून खाऊन झाल्यावर परत गूगल केले (हाताला  चाळा )तर ह्याच्या पण बऱ्याच फॅन्सी आणि सजवलेल्या कलाकृती मिळाल्या आणि कलाकंद हा मूळचा राजस्थानी पदार्थ आहे हि माहिती पण मिळाली  असो
नमनाला घडाभर तेल झाले आहे आता कलाकंद करूया
आंबा कलाकंद
साहित्य -
१. अर्धा लिटर नासलेले  नासकवणी दूध (पाणी काढून टाकायचे )
२. चार चमचे साखर किंवा चवीनुसार
३. दोन वेलदोड्याच्या पाकळ्या सोलून
४. एका माध्यम/छोट्या आंब्याचा रस

कृती -
१. नासलेले दूध मंद आचेवर ठेवून त्यात साखर आणि वेलदोडा घालून ढवळायचे
२. साधारण ५-७ मिनिटे ते दूध आटवत ठेवायचे
३. एकीकडे आंबा पिळून त्याचा रस काढायचा
४. आंब्याचा रस दुधात घालून हलवायचे
५. १५-२०मिनिटे ठेवायचे मध्ये मध्ये हलवत राहायचे
६. साधारण घट्ट आणि व्यवस्थित आटून (नेहमीच्या कलाकंदाप्रमाणे) झाला कि गॅस बंद करायचा आणि खायचा

 

No comments:

Post a Comment