nocopy

Sunday, May 17, 2020

स्वैपाकातले प्रयोग-दलिया बिर्याणी

आज रविवार काहीतरी वेगळे करायचे होते पण घरात काहीच नव्हते आणि दुकाने पण बंद. फ्रिज मध्ये असाच एवरेस्ट शाही बिर्याणी मसाला सापडला पाकिटावरची कृती आणि उपलब्ध साहित्याचा मेळ बसत नव्हता
मग असेच दलिया ला हा मसाला वापरून बघण्याचे ठरवले आणि करून पहिले बऱ्यापैकी जमली
कसुरी मेथी चे मोठे पाकीट आणल्यामुळे आजकाल प्रत्येक पदार्थात घातली जाते थोडी कडवट चव येते पण ह्या रेसिपीला नाही आली कदाचित टोमॅटो सॉस घातल्यामुळे असेल
साहित्य
१. दोन वाट्या दलिया
२. एक कांदा चिरून
३. दोन चमचे दही (चवीनुसार )
४. एवरेस्ट शाही बिर्याणी मसाला किंवा कुठलाही बिर्याणी मसाला एक चमचा (टेबलस्पून )
५. टोमॅटो प्युरी /टोमॅटो सॉस/टोमॅटो ketchup  ३ चमचे
६. मोहरी-जिरे -एक टीस्पून
७. हळद-तिखट -एक टीस्पून
८. मीठ चवीनुसार
९. चार चमचे तेल
१०. कसुरी मेथी एक चमचा (ऐच्छिक  )

कृती -
१. दलिया दोनदा धुऊन बाजूला ठेवून द्यायचा ५-१० मिनिटे
२. कांदा चिरून घ्यायचा
३. तेल तापवून हिंग,जिरे ,हळद ,तिखट घालून फोडणी करायची
४. कांदा आणि टोमॅटो प्युरी/टोमॅटो सॉस घालून तेल सुटेपर्यंत परतायचे कसुरी मेथी हवी असेल तर घालायची
५. त्यात दही आणि बिर्याणी मसाला घालून ४-५मिनिटे परतायचे
६. त्यात दलिया घालायचा मीठ आणि पाणी घालून साधारण २०-२५ मिनिटे झाकणावर पाणी घालून शिजवायचे
७. हा दलिया कूकर मधून काढला नसल्यामुळे जास्त वेळ माध्यम/मंद आचेवर शिजवावा लागतो

पारंपरिक बिर्याणीत भाज्या अजून बऱ्याच जास्त असतात तसेच शिजलेल्या बासमती भातावर वर परतलेले मिश्रण घालून हलवून मिसळून घ्यायचे आणि अजून बरेच काय काय असते वर बिर्याणी मसाला घातल्यामुळे दलिया बिर्याणी असे नामकरण करण्याचे धाडस केले आहे  

No comments:

Post a Comment