nocopy

Monday, April 27, 2020

पवित्रतास्वरूपिणी श्री शारदा माताजी -  पुस्तक  परिचय

साधारण एक दीड वर्षांपूर्वी पुण्यातल्या शारदा मठातल्या २ दिवसांच्या युवती शिबिराला जाणे झाले तो अनुभव फारच छान होता पूर्ण महाराष्ट्रातून खूप मुली आल्या होत्या एक तर nethrland हुन आली होती दोन दिवस ९-५ असे होते चहा नाश्ता जेवणासकट.

युवतींना अनुसरून शिबिरातील कार्यक्रम खेळ पथनाट्य असे उपक्रम होते सोबतच स्वामी विवेकानंद,रामकृष्ण परमहंस,आणि श्री शारदा माताजी ह्यांच्या जीवनाची ओळख पण तिथल्या ल्या माताजी सांगत होत्या.
भगिनी निवेदिता ह्यांच्या जीवनकार्यावर पण एक कार्यक्रम होता सगळेच फार छान सांगितले होते (lecture म्हणून बोर वाटले नाही )
मी पहिल्यांदाच गेले होते पण तिथे नेहमी येणाऱ्या बऱ्याच जणी होत्या
प्रवराजिका दिव्यानंदप्राणाजी ह्यांनी आजच्या कॉर्पोरेट जगतात येणाऱ्या समस्यांवर उपनिषदातील आणि वेदान्तातील  विवेचन आणि उपाय सांगितले
तसेच  Removing Mind Blocks ह्या विषयावर श्री आनंदप्राण माताजींचे सेशन झाले
varil donhi youtube var ahet

अजून एकांचे (नाव आठवत नाही ) पण ho'oponopono  technique वर अतिशय सुंदर असे सेशन झाले (आत्ता डिटेल्स आठवत नाहीयेत पण तो अनुभव खरंच फार छान होता)

ह्या शिबिराच्या एक्सपीरियन्स मुळे मी शारदा मठात जायला लागले आणि तिथे अजून  एक दोन अध्यात्मिक शिबिरे अटेंड केली तेव्हाच श्री शारदा माताजींचे चरित्र वाचण्यात आले वाचनाची आवड कमी झालेली असताना हे एकच पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवले गेले नाही (खूप दिवसांपासून आणलेले परमहंस योगानंद:योगी कथामृत पण अजून नीट वाचले नाही) त्यातील सहज सोपी भाषा आणि अध्यात्माचे अवडंबर ना माजवता संसार
करता करताच अध्यात्माचे मार्गदर्शन खरेच अलौकिक वाटले

तसेच त्यांचा संसारी आणि संन्यासी लोंकांशी एकच तरीपण त्यांच्या स्वभावधर्मानुसार वेगवेगळे वागण्याचे पण मनोज्ञ दर्शन घडते अजून ही बरच काही आहे पुस्तकात.  साध्या सोप्या प्रसंगातून त्यांची अनेक रूपे उलगडत जातात आणि थक्क होतो . श्री रामकृष्ण परमहंसांच्या माघारी आलेले दुख्खी वैराग्य प्रयत्नपूर्वक झटकून त्यांनी सोपवलेल्या कार्यासाठी संघजननीच्या रूपापर्यंत त्यांचे परिवर्तन प्रेरणादायी आहे
फक्त एकाच खंत वाटते कि त्या काळातील जीवनपद्धती वाचताना  तेव्हा वैद्यकीय सुविधा माताजींना लाभल्या असत्या तर खरेच खूप चांगले झाले असते असा विचार प्रकर्षांने मनात येतो
हा पुस्तकाच्या मलपृष्ठावर असलेला उताराच देते :

"पवित्रतास्वरूपिणी माताजी श्रीसारदादेवी यांच्या या लोकोत्तर जीवनात गुरु,देवी आणि माता - हि तिन्ही रूपे एकमेकांत अविभाज्यपणे समरस झालेली आहेत. जेव्हा आपण त्यांना'माता' रूपात पाहतो तेव्हा आपल्यासमोर प्रस्फुटी होते,अज्ञानाचा संपूर्ण निरास करणारी त्यांची अमोघ ज्ञानदायिनी शक्ती .
जेव्हा त्यांना गुरुरूपात पाहण्याची इच्छा करतो तेव्हा त्या मातृरुव धारण करून आपल्याला स्वतःच्या कुशीत ओढून घेतात;आणि जेव्हा गुरु व माता या रूपाने त्यांना जाणून घेण्याच्या यत्न करतो तेव्हा दिसते कि त्या सर्वातीत सर्वोच्च देवीरूपात आपल्या माहीममय स्थानी विराजमान आहेत.वास्तविकता अशी आहे कि श्रीमाताजींच्या या परस्परावलंबी अशा त्रिविध शक्तींच्या अविष्कारामध्ये कोणी कोठे संपते आणि कोणती कोठे आरंभ  होते ते आपल्या बुद्धीला उमगत नाही "

संसारी लोकांसाठी त्यांचे " गृहस्थाश्रम हा एकच असा आश्रम आहे कि त्याच्या आधारावर इतर तिन्ही आश्रम व्यवस्थित चालू शकतात म्हणून गृहस्थांनी व्यवस्थित संसार केलाच पाहिजे" हे मार्गदर्शन खूप वेगळे वाटले
(हे रामकृष्ण परमहंसांचे आहे का श्रीमाताजींचे हे आत्ता नीट आठवत नाहीये)
तसेच मठाच्या कामाबाबतीत मठाधिकाऱ्यांना " नुसते जप तप करून काय होणार आहे? काम हे केलेच पाहिजे" असे परखड बोल सुनावले आहेत


इतर बऱ्याच ठिकाणी संसार मिथ्या आणि ब्रह्म हेच सत्य असे असताना रामकृष्ण परमहंस आणि श्रीशारदा माताजी ह्यांचा संसार आणि मार्गदर्शन खूप वेगळे ठरते

आत्ता मठात गेले तरी तिथली शिस्त शांतता आणि प्रसन्न असलेले गांभीर्य जाणवते आणि श्रीमाताजींच्या कार्याचे महत्व कळते पाश्चिमात्य लोकांशी संपर्क आल्याने असेल कदाचित पण भारतीय अध्यात्म आणि मिशनऱ्यांची  वृत्ती ह्यांचा अनोखा मिलाफ झालेला दिसून येतो



पवित्रतास्वरूपिणी श्री शारदा माताजी -lekhak swami gambhranand

प्रकाशक :रामकृष्ण मठ प्रकाशन विभाग (नागपूर)
मूल्य:रु. १००/-



 

No comments:

Post a Comment