nocopy

Monday, April 27, 2020

पनीर उत्तप्पा (फसता फसता जमलेला )
आज रविवार सामान आणण्याचा दिवस थोडे उशिराच बाहेर पडले (१० ते १२ वेळ )
नेहमीच्या दुकानासमोर  मोठी रांग (कधी नव्हे ते) तरी हिम्मत न हारता संयमाने उभी राहिले आपल्या सर्वांच्या एका स्वभावैशिष्ट्यानुसार मध्ये मध्ये शिरणाऱ्या बायका,त्यांना हॅन्डल करणारा तो महान सिद्ध दुकानदार असे सगळे एन्जॉय करत असताना तिथे डोशाचे आयते पीठ दिसले मग काय घेऊन टाकले (खिशाचा विचार न करता)
सामान आणल्यावर सगळे  सामान मिठाच्या उकळत्या पाण्यात बुडवून काढले
डोसे /उत्तप्पे कधीतरी करू असा विचार केला पण मग नंतर म्हटले आजचा सुट्टीचा अक्षय तृतीयेचा दिवस आजच करून बघूया पनीर पण आणले होते तर पनीर उत्तप्पे करायचे ठरवले
तेल नसल्यामुळे तुपाचे मोहन घालून करून बघायचे ठरवले पण कुठेतरी फसले
साहित्य-
१. डोशाचे आयते पीठ
२. कांदे
३. कसुरी मेथी
४. कांदा लसूण मसाला
५. धने पावडर
६. पनीर
७. तूप
८. जिरे
९. हळद
कृती-
१. कांदे कसुरी मेथी चिरून डोशाच्या पिठात घातले. (पिठात थोडे पाणी घालून सरबरीत मिश्रण केले )
२. त्याच पिठात मीठ,कांदा लसूण मसाला,धने पावडर घालून हलवून घेतले.
३. पनीर किसून घातले. थोडा वेळ (५ मिनिटे)ठेवले
४. तूप गरम करून त्यात जिरे आणि एकदम थोडी हळद घालून फोडणी केली
५. डोशाच्या मिश्रणात हि फोडणी वरून घालून चांगले हलवून १० मिनिटे ठेवले
६. तवा गरम करून त्यावर एक डाव इतके प्रमाण घेऊन घातले (थोडेसे गोलाकार येईल एवढेच फिरवले)
७. पहिले २ उत्तप्पे चांगले निघाले पण नंतर सगळे चिकटून बसायला लागले
८. शेवटी होतील तेवढे आणि जमतील तसे केले आणि खाल्ले
तर ह्यात काय चुकले असावे?
१. पनीर पिठात घातल्याबद्दल doubt येतोय कारण गूगल वर बऱ्याच ठिकाणी तव्यावर डोसा टाकल्यावर एका बाजूला कांदा ,पनीर इ. घालण्यास सांगितले होते पण ते पण चिकटण्याच्या भीतीने मी आधीच मिश्रणात टाकले
२. पिठातच तुपाचे मोहन घातले पण मागे पण असे डोसे केलेले आहेत उलट असे मोहन घातल्याने नंतर मुळीच तेल घालावे लागत  नाही बाजूने
पहिले २ व्यवस्थित झाले होते पण नंतर काय फसले काहीच कळत नाही
कंटाळून पीठ फ्रिज मध्ये ठेवून दिले

एका मराठी संकेतस्थळावर (मिसळपाव.कॉम ) वर सल्ले पण विचारून झाले
पण तव्यावर डोसा टाकल्यावर मग पनीर पेरण्याच suggestion मिळाले  तेवढेच

परत दुसऱ्या दिवशी तेच फ्रिजमधले पीठ काढले (संपवायचेच होते ना आणि इडली पात्र तर नव्हते )
मग थोडा विचार करून गरम तव्यावर आधी थोडे तूप पसरवून घेतले मग डावाने मिश्रण टाकून ते उत्तप्यापेक्षा कमी जाड पण डोशापेक्षा कमी पातळ साधारण धिरड्या सारखे पसरवले आणि झाल्यावर परत उलटून थोड्या वेळाने काढली तर जमली चक्क.



एकावर एक अशी दोन ठेवली आहेत सोबत कलाकंद,mayonese आणि जवसाची चटणी तोंडीलावणे म्हणून .... 

No comments:

Post a Comment