Lockdown रेसिपीज-मुगाच्या डाळीची खिचडी
साहित्य-
१. मुगाची डाळ
२. तांदूळ (मी दोन्ही एकास एक असे घेतले होते )
३. तूप
४. जिरे
५. .हळद
६.तिखट
७. गोडा मसाला
८. कसुरी मेथी (ह्याने थोडा कडवटपणा येतो चालत असल्यास घालणे किंवा मग नंतर साखर जास्त घालणे )
कृती-
१.एका पातेल्यात मंद आचेवर तूप गरम करून त्यात आधी जिरे घालायचे
२. जिरे तडतडले कि त्यात हळद घालायची.
३.हळद घातल्यावर लगेच तिखट आणि धने पावडर घालायची.
४. थोडी कसुरी मेथी घालायची (चवीनुसार )
५. मग धुतलेले डाळ तांदूळ घालायचे.
६. आपल्या चवीनुसार साखर आणि मीठ घालणे सगळे व्यवस्थित परतून घ्यायचे.
७. सगळयात शेवटी पाणी घालून झाकण घालून १५-२० मिनिटे शिजवायचे. ह्यात पाणी आणि शिजवायचा वेळ ह्यात फरक पडू शकतो मऊसर खिचडी हवी असल्यास पाणी जास्त घालायचे
(खाली लागू नये म्हणून झाकणावर पाणी घालून शिजवायची)
टीप-बासमती तांदुळाची जास्त चांगली होते, उपलब्धतेनुसार कांदा -टोमॅटो & इतर अनेक आवडीच्या भाज्या घालून शकता तेवढा शिजायला जास्त वेळ लागेल.
No comments:
Post a Comment