😝Lockdown रेसिपीज
सध्या लॉक डाउन सुरु आहेच लॉक डाउन साठी काही एकदम सोप्या पाक कृती देतेय(आळशी तसेच बिझी लोकांसाठी)
सगळ्यांची फोडणी एकच आहे फक्त मुख्य घटक वेगवेगळे
फोडणीचे साहित्य :-(सर्व साहित्य आपापल्या चव,डाएट आणि आपल्या भागातील किराणामालाच्या उपलब्धतेनुसार नुसार)
प्रमाण मुद्दामच दिले नाहीये-अंदाजपंचे
१. तूप
२.जिरे
३.हळद
४. तिखट
५.धने पावडर
६. गोडा मसाला (फक्त मुगाच्या खिचडीसाठी)
७. कांदालसून मसाला
८.कांदे
९.टोमॅटो
१०.कसुरी मेथी (थोडी कडवट चव येते चालत असल्यास घालणे)
११.शेझवान चटणी/मसाला पावडर (ह्याची चव कधी लागते कधी नाही ,आवडत असल्यास घालणे शक्यतो मुख्य घटक घातल्यावर वरून घालणे फोडणीत नाही )
तर आता गॅसच्या मंद आचेवर ह्या वरच्या सर्व साहित्याची फोडणी करायची आणि खालील variations try करायची
मीठ आणि साखर चवीनुसार मुख्य पदार्थ घातल्यावर घालायचे.
१. शेवयाचा उपमा -
घटक पदार्थ- bambino /पतंजली च्या vermiceli म्हणून मिळणाऱ्या शेवया
कृती - ह्यात तव्यावर ह्या शेवया आधी भाजून घ्यायच्या थोड्याशा .
आणि मग वरच्या फोडणीत घालून परतून पाणी घालून,मीठ साखर घालून ,१५-२० मिनिटे माध्यम/मंद आचेवर शिजवायच्या.
पाणी आपल्याला कसा उपमा हवा आहे त्यावर. Chinese नूडल्स चा फील हवा असेल तर जास्त नाहीतर नेहमीसारखे.
एक फसलेले variation-मी ताकात करायचा प्रयत्न केला होता पण ते आंबट लागले 😝-आपापल्या रिस्कवर try करावे .
|
शेवयाचा उपमा (बाजूला भडंग आणि लोणचे)
|
२.दलिया आणि मुगाची खिचडी -
घटक पदार्थ-
दलिया (सिद्धकलाचा पण मिळतो एक भाजलेला),मुगाची डाळ
कृती- ह्यात जास्त काही नाही फक्त फोडणीत मुगाची डाळ आधी परतायची दोन्ही एकदम घातले तरी चालते.
generally बरेच जण दलिया कुकर मध्ये शिजवून मग फोडणी करतात मी एकदमच केले फक्त अर्धा तासाच्या आसपास शिजवायचे ह्यात कांदा टोमॅटो घातले नव्हते
३..मुगाच्या डाळीची खिचडी-
घटक पदार्थ-मुगाची डाळ आणि तांदूळ
कृती-ह्यात काही सांगण्यासारखे नाही 😄😄😄
डाळ तांदूळ भिजवून घ्यायचे आणि फोडणीत शिजवायचे २०-२५ मिनिटे
मी ह्यात कांदा टोमॅटो आणि दालचिनी घालून वेगळेपणाचा प्रयत्न केला पण चवीत काही जास्त फरक पडला नाही
आता lockdown ड्रिंक -बर्फाचा गोळा 😄😄😄
घटक- jalani आम पन्हे पावडर ,पाणी
कृती-एक ग्लास पाण्यात वरचे एक पाऊच घालून ढवळून फ्रीझ मध्ये अर्धा तास ठेवायचे
थंडगार सरबत आणि निम्मा बर्फाचा गोळा असे बनते (असेच jalani च्या निंबू पावडर चे पण केले पण ते इतके खास नाहो होत
steelchya भांड्यात ठेवल्याने असा आकार आलाय
(घटक पदार्थांचे फोटो google वरून साभार )
Happy Lockdown stay safe happy & healthy at home and lets pray to end this panic situation soon.