nocopy

Sunday, May 17, 2020

स्वैपाकातले प्रयोग-दलिया बिर्याणी

आज रविवार काहीतरी वेगळे करायचे होते पण घरात काहीच नव्हते आणि दुकाने पण बंद. फ्रिज मध्ये असाच एवरेस्ट शाही बिर्याणी मसाला सापडला पाकिटावरची कृती आणि उपलब्ध साहित्याचा मेळ बसत नव्हता
मग असेच दलिया ला हा मसाला वापरून बघण्याचे ठरवले आणि करून पहिले बऱ्यापैकी जमली
कसुरी मेथी चे मोठे पाकीट आणल्यामुळे आजकाल प्रत्येक पदार्थात घातली जाते थोडी कडवट चव येते पण ह्या रेसिपीला नाही आली कदाचित टोमॅटो सॉस घातल्यामुळे असेल
साहित्य
१. दोन वाट्या दलिया
२. एक कांदा चिरून
३. दोन चमचे दही (चवीनुसार )
४. एवरेस्ट शाही बिर्याणी मसाला किंवा कुठलाही बिर्याणी मसाला एक चमचा (टेबलस्पून )
५. टोमॅटो प्युरी /टोमॅटो सॉस/टोमॅटो ketchup  ३ चमचे
६. मोहरी-जिरे -एक टीस्पून
७. हळद-तिखट -एक टीस्पून
८. मीठ चवीनुसार
९. चार चमचे तेल
१०. कसुरी मेथी एक चमचा (ऐच्छिक  )

कृती -
१. दलिया दोनदा धुऊन बाजूला ठेवून द्यायचा ५-१० मिनिटे
२. कांदा चिरून घ्यायचा
३. तेल तापवून हिंग,जिरे ,हळद ,तिखट घालून फोडणी करायची
४. कांदा आणि टोमॅटो प्युरी/टोमॅटो सॉस घालून तेल सुटेपर्यंत परतायचे कसुरी मेथी हवी असेल तर घालायची
५. त्यात दही आणि बिर्याणी मसाला घालून ४-५मिनिटे परतायचे
६. त्यात दलिया घालायचा मीठ आणि पाणी घालून साधारण २०-२५ मिनिटे झाकणावर पाणी घालून शिजवायचे
७. हा दलिया कूकर मधून काढला नसल्यामुळे जास्त वेळ माध्यम/मंद आचेवर शिजवावा लागतो

पारंपरिक बिर्याणीत भाज्या अजून बऱ्याच जास्त असतात तसेच शिजलेल्या बासमती भातावर वर परतलेले मिश्रण घालून हलवून मिसळून घ्यायचे आणि अजून बरेच काय काय असते वर बिर्याणी मसाला घातल्यामुळे दलिया बिर्याणी असे नामकरण करण्याचे धाडस केले आहे  

Saturday, May 9, 2020

आंबा कलाकंद

घरात एकच आंबा उरला होता त्याचे काहीतरी प्रयोग करावे असे सारखे मनात येत होते आंबा खीर,शिरा ह्यासाठी सुकामेवा आणि रवा नव्हता आंबा दलिया शिरा/खीर करावी असे पण वाटत होते गूगल केले तर त्याच्या ठिकठिकाणच्या पाककृती वाचून एकतर आंब्याचा रव्याचा शिरा किंवा साधा दलिया शिरा/खीर अशी माहिती मिळत होती आणि इंग्लिश मध्ये काही ठिकाणी आंबा दलिया खीर/शिरा माहिती मिळाली ती  वाचून तेवढे सगळे करण्याचा पेशन्स नव्हता स्वतःहून try करायचे म्हणाले तर मागच्यासारखे फसायला नको म्हणून हात चालत नव्हते आंबा तसाच खाऊन संपवला जाणार बहुधा अशी तयारी केली होती अशातच दूध नासले
आता त्याचे दही/पनीर/कलाकंद ह्यातले  काहीतरी करणे भाग होते कलाकंद मागच्याच आठवड्यात झाला होता
तरी पण बनवायला सोपा (वेळखाऊ असला तरी ) तोच एक option होता
थोडेसे कंटाळूनच दुधातले पाणी काढून टाकले फक्त घट्ट नासकवणी दूध ठेवले गॅस वर साखर आणि वेलदोड्याचे दोन दाणे /पाकळ्या घातल्या आणि ढवळायला लागले अचानकच त्या आंब्याचा विचार आला आणि करून पाहूया म्हटले मग काय एकीकडे गॅस वर कलाकंद मंद आचेवर ठेवलाच होता एकीकडे तो मध्यम आकाराचा आंबा पिळून त्याचा रस काढला थोडासा चमच्याने सारखा केला आणि गॅसवर ठेवलेल्या कलाकंदात  दिला घालून साधारण १५-२० मिनटे आटवले आणि झाला मँगो कलाकंद तयार !
खाताना थोडीशी बर्फीसारखी चव लागली आज गरम खाल्ला उद्या फ्रीज्ड version खाऊन बघू
हे बनवून खाऊन झाल्यावर परत गूगल केले (हाताला  चाळा )तर ह्याच्या पण बऱ्याच फॅन्सी आणि सजवलेल्या कलाकृती मिळाल्या आणि कलाकंद हा मूळचा राजस्थानी पदार्थ आहे हि माहिती पण मिळाली  असो
नमनाला घडाभर तेल झाले आहे आता कलाकंद करूया
आंबा कलाकंद
साहित्य -
१. अर्धा लिटर नासलेले  नासकवणी दूध (पाणी काढून टाकायचे )
२. चार चमचे साखर किंवा चवीनुसार
३. दोन वेलदोड्याच्या पाकळ्या सोलून
४. एका माध्यम/छोट्या आंब्याचा रस

कृती -
१. नासलेले दूध मंद आचेवर ठेवून त्यात साखर आणि वेलदोडा घालून ढवळायचे
२. साधारण ५-७ मिनिटे ते दूध आटवत ठेवायचे
३. एकीकडे आंबा पिळून त्याचा रस काढायचा
४. आंब्याचा रस दुधात घालून हलवायचे
५. १५-२०मिनिटे ठेवायचे मध्ये मध्ये हलवत राहायचे
६. साधारण घट्ट आणि व्यवस्थित आटून (नेहमीच्या कलाकंदाप्रमाणे) झाला कि गॅस बंद करायचा आणि खायचा

 

Thursday, May 7, 2020

shinchan :एक उत्तम स्ट्रेस बस्टर

ShinChan | Sinchan cartoon

सध्या लॉकडाऊनमुळे टीव्ही बघण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे घरून काम करून आणि बाकीची कामे, फोनाफोनी करून झाल्यावर तेवढाच विरंगुळा उरतो टीव्ही सोडून करण्यासारखे खूप आहे हे कळते तरी वळत नाही असो
पण सारख्या न्यूज चॅनेलवरच्या करोनाच्या घाबरवणाऱ्या बातम्या,सासू सुनांच्या कौटुंबिक भांडणाच्या अमरत्व लाभलेल्या सिरिअल्स ,त्यातच पौराणिक देवादिकांच्या अमरचित्रकथा ,तेच ते चित्रपट (उदा. सोनी -सूर्यवंशम ,झी-हम आपके  है कौन ,हम  साथ साथ हे आणि राजश्री production चे सिनेमे ,कलर्स -कारण जोहर चे सिनेमे ) ते संपले कि दक्षिण भारतीय डब केलेले अतर्क्य आणि अचाट सिनेमे ह्यातून बघायला काहीच उरत नाही.
पाककृती चॅनेल्स बघून आपल्याकडे ते सामान नसल्यामुळे फॅन्सी रेसिपी करता न येण्याचे दुःख नको म्हणून त्या बंद आणि वेब सेरीजचे प्रोमोज बघूनच त्याला आपला पास देऊन टाकला होता नाही म्हणायला गाण्याची चॅनेल्स होतीच पण ती पण एका लिमिट नंतर कंटाळवाणी झाली जुन्या विनोदी सिरिअल्स -देख भाई देख,हम पांच इ.पण चालू केल्या आहेत पण त्या बघून हसू यायचे बंद झाले होते कपिल शर्मा आणि चला हवा येऊ द्या मधले ओढून ताणून केलेले आचरट विनोद आणि पंचेस ने हसणेच विसरले होते
अशातच सहजच shinchan बघितले आणि खूपच रिलीफ मिळाला घरचे लहान आहेस का म्हणून ओरडायला लागले तरी पण बघतच राहिले इतक्या वर्षांनी तोच ताजेपणा आणि हसायला मिळाले
एका ५ वर्षांच्या जपानी मुलाचे सहजसुंदर जीवन आणि रेखाटलेले भावविश्व,त्याला पडणारे प्रश्न आणि त्याची त्याने केलेली उकल त्यातून घडणाऱ्या गमतीजमती ह्या सगळ्यामुळे एक वेगळीच भट्टी जमून आलीये
shinchan ,त्याची बहीण हिमवारी,त्यांचे पालक,श्वान मित्र शिरो आणि शाळेचे सोबती ह्या पात्रांवर रेखाटलेली एक धम्माल कार्टून सिरीज म्हणजे shinchan
रोजच्याच जीवनातले साधे प्रसंग घेऊन त्यातून कशी धम्माल विनोद निर्मिती करता येते त्याचे मस्त ऍनिमेशन कम चित्रण आहे
जपानी संस्कृतीचे चित्रण आणि डबिंग voice ओव्हर आर्टिस्ट्स ची मेहनत पण उल्लेखनीय (८०% श्रेय व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट्स चेच आहे खरे तर )
कुतूहल वाटून गूगल केले तर वेगळीच माहिती आली एवढ्या धम्माल विनोदी पात्राची खरी माहिती करुण आहे
शिनोसुक नोहारा नावाच्या एका ५ वर्षीय मुलाने आपल्या बहिणीला वाचवायला प्राण दिले असे काहीसे लिहिले होते दुर्दैवाने दोघेही रोड accident मध्ये गेले त्या धक्क्याने निराश होऊन त्यांच्या आईने (मिस्सीने )त्यांची रेखाटने करायला सुरुवात केली आणि ते असते तर कसे प्रसंग घडले असते असे इमॅजिन करायला देखील ती रेखाटने
shinchan चे जनक Yoshito Usui ह्यांना मिळाली त्याने प्रेरित होऊन त्यांनी हि कार्टून सिरीज बनवली अशी वदंता आहे ह्याबद्दल बरीच मतमतांतरे आहेत (लिंक-https://www.quora.com/What-is-the-real-story-behind-the-character-Shin-chan)
https://en.wikipedia.org/wiki/Crayon_Shin-chan ह्या लिंकवर shinchan सिरीजची माहिती मिळते
ह्या लिंकवर वरील गोष्टीचा उल्लेख नसल्यामुळे ती वदंताच मानवी लागते
तसेच भारतीय पालकांनी shinchan बद्दल तक्रार केल्याची पण रंजक माहिती मिळाली shinchan chi उद्धटता आपल्या संस्कृतीशी मिळत नसल्याने आणि ते बघून मुले बिघडत असल्याने shinchan चे बरेच भारतीयीकरण करण्यात आले (जसे कि अल्कोहोल च्या जागी juice आणि काही सीन्स सेन्सॉर करण्यात आले )
मी पूर्वी बघितलेले shinchan आणि आत्ताचे shinchan ह्यात फरक जाणवतो तरी पण विनोद उणावत नाही
पण सौम्य केल्याने चांगले वाटते इतकेच

लॉकडाऊन चालू होण्याआधी पण जेव्हा ऑफिस मधून आल्यावर बघायचे तेव्हा एकदम ताणरहित फ्रेश झाल्यासारखे वाटायचे बाकी कार्टून्स कधीच बघितली नाहीत सध्या बघायचा प्रयत्न करते पण नाहीच आवडत shinchan शी जसे कनेक्ट होता येते तसे हल्लीचे कुठलेच कार्टून वाटत नाहीये (काही काहींची थिम चांगली असूनदेखील बघावीशी वाटत नाहीत)
पूर्वीची लहानपणीची आत्ता relate होत नाही फक्त shinchan च कालातीत वयातीत राहिलाय


अजून कोणी आहे का shinchan आवडणारे?

अवांतर - मस्ती चॅनेल वर अन्नू कपूरचा गोल्डन इरा विथ अन्नू कपूर हा कार्यक्रम पण चांगला असतो जुन्या गाण्यांसोबत गीतकार,संगीतकार आणि गायक ,नटांचे वेगवेगळे किस्से पण सांगतो

(फोटो गूगल वरून साभार )

 

Wednesday, April 29, 2020

 
शतशब्दकथा  : प्रतिसाद

लॉकडाऊनमुळे कधी नव्हे ते तिने पहिल्यांदा शतशब्दकथा  स्पर्धेत  भाग घेतला होता
उत्साहाने २ कथा पाठवून रोज लहान मुलासारखे संकेतस्थळ उघडून प्रतिसादांची वाट बघायला लागली पण काहीच प्रतिसाद नसल्यमुळे खट्टू व्हायची
अशातच स्पर्धेची मुदत संपली,विजेते पण घोषित झाले आपण नसणार हे माहिती होतेच
'जाऊदे पहिलाच प्रयत्न होता,स्वान्त सुखाय लिहिले होते असेच गम्मत म्हणून' हिरमुसलेल्या मनाची समजूत घालून ती विसरून गेली आणि रोजच्या रहाटगाडग्यात मग्न झाली

पंधरवड्याने मेल बॉक्स बघताना उडालीच टुणकन खुर्चीतून  ----------------




" आपली  संकेतस्थळावर --------------- हि शतशब्दकथा वाचली कथेतली storyline आवडली असून त्यावर
वेबसिरीज बनवायचा मानस आहे तरी आपण मला ह्या मेल वर संपर्क करा म्हणजे बोलता येईल "

----------------
आघाडीचा दिग्दर्शक
प्रसिद्ध निर्मितीसंस्था





 

Monday, April 27, 2020

पवित्रतास्वरूपिणी श्री शारदा माताजी -  पुस्तक  परिचय

साधारण एक दीड वर्षांपूर्वी पुण्यातल्या शारदा मठातल्या २ दिवसांच्या युवती शिबिराला जाणे झाले तो अनुभव फारच छान होता पूर्ण महाराष्ट्रातून खूप मुली आल्या होत्या एक तर nethrland हुन आली होती दोन दिवस ९-५ असे होते चहा नाश्ता जेवणासकट.

युवतींना अनुसरून शिबिरातील कार्यक्रम खेळ पथनाट्य असे उपक्रम होते सोबतच स्वामी विवेकानंद,रामकृष्ण परमहंस,आणि श्री शारदा माताजी ह्यांच्या जीवनाची ओळख पण तिथल्या ल्या माताजी सांगत होत्या.
भगिनी निवेदिता ह्यांच्या जीवनकार्यावर पण एक कार्यक्रम होता सगळेच फार छान सांगितले होते (lecture म्हणून बोर वाटले नाही )
मी पहिल्यांदाच गेले होते पण तिथे नेहमी येणाऱ्या बऱ्याच जणी होत्या
प्रवराजिका दिव्यानंदप्राणाजी ह्यांनी आजच्या कॉर्पोरेट जगतात येणाऱ्या समस्यांवर उपनिषदातील आणि वेदान्तातील  विवेचन आणि उपाय सांगितले
तसेच  Removing Mind Blocks ह्या विषयावर श्री आनंदप्राण माताजींचे सेशन झाले
varil donhi youtube var ahet

अजून एकांचे (नाव आठवत नाही ) पण ho'oponopono  technique वर अतिशय सुंदर असे सेशन झाले (आत्ता डिटेल्स आठवत नाहीयेत पण तो अनुभव खरंच फार छान होता)

ह्या शिबिराच्या एक्सपीरियन्स मुळे मी शारदा मठात जायला लागले आणि तिथे अजून  एक दोन अध्यात्मिक शिबिरे अटेंड केली तेव्हाच श्री शारदा माताजींचे चरित्र वाचण्यात आले वाचनाची आवड कमी झालेली असताना हे एकच पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवले गेले नाही (खूप दिवसांपासून आणलेले परमहंस योगानंद:योगी कथामृत पण अजून नीट वाचले नाही) त्यातील सहज सोपी भाषा आणि अध्यात्माचे अवडंबर ना माजवता संसार
करता करताच अध्यात्माचे मार्गदर्शन खरेच अलौकिक वाटले

तसेच त्यांचा संसारी आणि संन्यासी लोंकांशी एकच तरीपण त्यांच्या स्वभावधर्मानुसार वेगवेगळे वागण्याचे पण मनोज्ञ दर्शन घडते अजून ही बरच काही आहे पुस्तकात.  साध्या सोप्या प्रसंगातून त्यांची अनेक रूपे उलगडत जातात आणि थक्क होतो . श्री रामकृष्ण परमहंसांच्या माघारी आलेले दुख्खी वैराग्य प्रयत्नपूर्वक झटकून त्यांनी सोपवलेल्या कार्यासाठी संघजननीच्या रूपापर्यंत त्यांचे परिवर्तन प्रेरणादायी आहे
फक्त एकाच खंत वाटते कि त्या काळातील जीवनपद्धती वाचताना  तेव्हा वैद्यकीय सुविधा माताजींना लाभल्या असत्या तर खरेच खूप चांगले झाले असते असा विचार प्रकर्षांने मनात येतो
हा पुस्तकाच्या मलपृष्ठावर असलेला उताराच देते :

"पवित्रतास्वरूपिणी माताजी श्रीसारदादेवी यांच्या या लोकोत्तर जीवनात गुरु,देवी आणि माता - हि तिन्ही रूपे एकमेकांत अविभाज्यपणे समरस झालेली आहेत. जेव्हा आपण त्यांना'माता' रूपात पाहतो तेव्हा आपल्यासमोर प्रस्फुटी होते,अज्ञानाचा संपूर्ण निरास करणारी त्यांची अमोघ ज्ञानदायिनी शक्ती .
जेव्हा त्यांना गुरुरूपात पाहण्याची इच्छा करतो तेव्हा त्या मातृरुव धारण करून आपल्याला स्वतःच्या कुशीत ओढून घेतात;आणि जेव्हा गुरु व माता या रूपाने त्यांना जाणून घेण्याच्या यत्न करतो तेव्हा दिसते कि त्या सर्वातीत सर्वोच्च देवीरूपात आपल्या माहीममय स्थानी विराजमान आहेत.वास्तविकता अशी आहे कि श्रीमाताजींच्या या परस्परावलंबी अशा त्रिविध शक्तींच्या अविष्कारामध्ये कोणी कोठे संपते आणि कोणती कोठे आरंभ  होते ते आपल्या बुद्धीला उमगत नाही "

संसारी लोकांसाठी त्यांचे " गृहस्थाश्रम हा एकच असा आश्रम आहे कि त्याच्या आधारावर इतर तिन्ही आश्रम व्यवस्थित चालू शकतात म्हणून गृहस्थांनी व्यवस्थित संसार केलाच पाहिजे" हे मार्गदर्शन खूप वेगळे वाटले
(हे रामकृष्ण परमहंसांचे आहे का श्रीमाताजींचे हे आत्ता नीट आठवत नाहीये)
तसेच मठाच्या कामाबाबतीत मठाधिकाऱ्यांना " नुसते जप तप करून काय होणार आहे? काम हे केलेच पाहिजे" असे परखड बोल सुनावले आहेत


इतर बऱ्याच ठिकाणी संसार मिथ्या आणि ब्रह्म हेच सत्य असे असताना रामकृष्ण परमहंस आणि श्रीशारदा माताजी ह्यांचा संसार आणि मार्गदर्शन खूप वेगळे ठरते

आत्ता मठात गेले तरी तिथली शिस्त शांतता आणि प्रसन्न असलेले गांभीर्य जाणवते आणि श्रीमाताजींच्या कार्याचे महत्व कळते पाश्चिमात्य लोकांशी संपर्क आल्याने असेल कदाचित पण भारतीय अध्यात्म आणि मिशनऱ्यांची  वृत्ती ह्यांचा अनोखा मिलाफ झालेला दिसून येतो



पवित्रतास्वरूपिणी श्री शारदा माताजी -lekhak swami gambhranand

प्रकाशक :रामकृष्ण मठ प्रकाशन विभाग (नागपूर)
मूल्य:रु. १००/-



 
पनीर उत्तप्पा (फसता फसता जमलेला )
आज रविवार सामान आणण्याचा दिवस थोडे उशिराच बाहेर पडले (१० ते १२ वेळ )
नेहमीच्या दुकानासमोर  मोठी रांग (कधी नव्हे ते) तरी हिम्मत न हारता संयमाने उभी राहिले आपल्या सर्वांच्या एका स्वभावैशिष्ट्यानुसार मध्ये मध्ये शिरणाऱ्या बायका,त्यांना हॅन्डल करणारा तो महान सिद्ध दुकानदार असे सगळे एन्जॉय करत असताना तिथे डोशाचे आयते पीठ दिसले मग काय घेऊन टाकले (खिशाचा विचार न करता)
सामान आणल्यावर सगळे  सामान मिठाच्या उकळत्या पाण्यात बुडवून काढले
डोसे /उत्तप्पे कधीतरी करू असा विचार केला पण मग नंतर म्हटले आजचा सुट्टीचा अक्षय तृतीयेचा दिवस आजच करून बघूया पनीर पण आणले होते तर पनीर उत्तप्पे करायचे ठरवले
तेल नसल्यामुळे तुपाचे मोहन घालून करून बघायचे ठरवले पण कुठेतरी फसले
साहित्य-
१. डोशाचे आयते पीठ
२. कांदे
३. कसुरी मेथी
४. कांदा लसूण मसाला
५. धने पावडर
६. पनीर
७. तूप
८. जिरे
९. हळद
कृती-
१. कांदे कसुरी मेथी चिरून डोशाच्या पिठात घातले. (पिठात थोडे पाणी घालून सरबरीत मिश्रण केले )
२. त्याच पिठात मीठ,कांदा लसूण मसाला,धने पावडर घालून हलवून घेतले.
३. पनीर किसून घातले. थोडा वेळ (५ मिनिटे)ठेवले
४. तूप गरम करून त्यात जिरे आणि एकदम थोडी हळद घालून फोडणी केली
५. डोशाच्या मिश्रणात हि फोडणी वरून घालून चांगले हलवून १० मिनिटे ठेवले
६. तवा गरम करून त्यावर एक डाव इतके प्रमाण घेऊन घातले (थोडेसे गोलाकार येईल एवढेच फिरवले)
७. पहिले २ उत्तप्पे चांगले निघाले पण नंतर सगळे चिकटून बसायला लागले
८. शेवटी होतील तेवढे आणि जमतील तसे केले आणि खाल्ले
तर ह्यात काय चुकले असावे?
१. पनीर पिठात घातल्याबद्दल doubt येतोय कारण गूगल वर बऱ्याच ठिकाणी तव्यावर डोसा टाकल्यावर एका बाजूला कांदा ,पनीर इ. घालण्यास सांगितले होते पण ते पण चिकटण्याच्या भीतीने मी आधीच मिश्रणात टाकले
२. पिठातच तुपाचे मोहन घातले पण मागे पण असे डोसे केलेले आहेत उलट असे मोहन घातल्याने नंतर मुळीच तेल घालावे लागत  नाही बाजूने
पहिले २ व्यवस्थित झाले होते पण नंतर काय फसले काहीच कळत नाही
कंटाळून पीठ फ्रिज मध्ये ठेवून दिले

एका मराठी संकेतस्थळावर (मिसळपाव.कॉम ) वर सल्ले पण विचारून झाले
पण तव्यावर डोसा टाकल्यावर मग पनीर पेरण्याच suggestion मिळाले  तेवढेच

परत दुसऱ्या दिवशी तेच फ्रिजमधले पीठ काढले (संपवायचेच होते ना आणि इडली पात्र तर नव्हते )
मग थोडा विचार करून गरम तव्यावर आधी थोडे तूप पसरवून घेतले मग डावाने मिश्रण टाकून ते उत्तप्यापेक्षा कमी जाड पण डोशापेक्षा कमी पातळ साधारण धिरड्या सारखे पसरवले आणि झाल्यावर परत उलटून थोड्या वेळाने काढली तर जमली चक्क.



एकावर एक अशी दोन ठेवली आहेत सोबत कलाकंद,mayonese आणि जवसाची चटणी तोंडीलावणे म्हणून .... 

Saturday, April 25, 2020


Lockdown रेसिपीज-मुगाच्या डाळीची खिचडी

साहित्य-
१. मुगाची डाळ
२. तांदूळ (मी दोन्ही एकास एक असे घेतले होते )
३. तूप
४. जिरे
५. .हळद
६.तिखट
७. गोडा मसाला
८.  कसुरी मेथी (ह्याने थोडा कडवटपणा येतो चालत  असल्यास घालणे किंवा मग नंतर साखर जास्त घालणे )


कृती-
१.एका पातेल्यात मंद आचेवर तूप गरम करून त्यात आधी जिरे घालायचे
२. जिरे तडतडले कि त्यात हळद घालायची.
३.हळद घातल्यावर लगेच तिखट आणि धने पावडर घालायची.
४. थोडी कसुरी मेथी घालायची (चवीनुसार )
५. मग धुतलेले डाळ तांदूळ घालायचे.
६. आपल्या चवीनुसार साखर आणि मीठ घालणे सगळे व्यवस्थित परतून घ्यायचे.
७. सगळयात शेवटी पाणी घालून झाकण घालून १५-२० मिनिटे शिजवायचे. ह्यात पाणी आणि शिजवायचा वेळ ह्यात फरक पडू शकतो मऊसर खिचडी हवी असल्यास पाणी जास्त घालायचे
(खाली लागू नये म्हणून झाकणावर पाणी घालून शिजवायची)




टीप-बासमती तांदुळाची जास्त चांगली होते, उपलब्धतेनुसार कांदा -टोमॅटो & इतर अनेक आवडीच्या भाज्या घालून शकता तेवढा शिजायला जास्त वेळ लागेल.




 

Friday, April 24, 2020

kucch dile ne kaha


कुछ दिल ने कहा
 ब्लॅक & व्हाईट songs खूप आवडतात आणि भावतात
त्यातलेच एक ऑल टाईम favourite गाणे म्हणजे कुछ दिल ने कहा

blob:A55FCEB0-1541-4480-9DE3-80CA512059A7



(सौजन्य: youtube)


गाणे: कुछ दिल ने कहा
चित्रपट:अनुपमा (१९६६)
गायिका :लता मंगेशकर
संगीत: हेमंतकुमार
गीतकार:कैफी आझमी


ह्या गाण्यात सगळेच जमून आले आहे गाण्याचे शब्द ऐकताना जगण्याचे सारच ४ ओळीत सांगितल्याचे फील येते विशेष करून  दुसरे कडवे
महाबळेश्वर चे छायाचित्रण पण खूप डोळे शांतावणारे आहे आणि शर्मिला टागोर आणि धर्मेंद्र चा अभिनय पण जमून आला आहे
एक रहस्यमयी डूब संगीतात जाणवते नायिका स्वतःच्याच तंद्रीत तरी पण काहीतरी सगळ्यांना लागू  होईल असे काहीतरी संगतीये असे वाटते
गाणे खूपच आवडीचे झाल्याने हा चित्रपट उत्सुकतेने पहिला पण थोडी निराशा झाली गाणी आणि संगीत अप्रतिम आहे पण कथा अजून फुलवता आली असती असे वाटले कथा बीज चांगले आहे पण नंतरचा भाग आटोपल्यासारखा वाटतो ओव्हरऑल चांगला चित्रपट आहे
(हृषीकेश मुखर्जी हे नाव वाचून आणि गाण्यांमुळे अपेक्षा खूपच वाढल्या होत्या) मी तुनळीवर पहिला असल्यामुळे काटछाटीची शक्यता आहे
ह्याच्यातलेच अजून एक गाणे धीरे धीरे machal  ते पण खूप आवडते (त्यातला हिरो कसाही असला तरी)

blob:D9DD5AB9-CE2B-4E66-AE14-7D1A6C46EF1A

अजून खूप ब्लॅक & व्हाईट गाणी आवडतात त्याकाळचे जीवन दिसून येते आणि आत्ता पेक्षा त्याकाळचे जीवन चांगले होते असे वाटायला लागते तेवढ्यात व्हाट्सएप वर काहीतरी msg नोटिफिकेशन येते आणि आत्ता आहे तेच चांगले अशी गाडी रुळावर येते

असेच अजून एक गाणे आहे तुलनेने नवीन आहे

कहांसे आये badara

blob:8FC9AAC6-DBF3-40D9-AA70-12EC2F269AD2


Kahan Se Aye Badra - Yesudas & Haimanti Shukla - Chashm-e-Buddoor

Movie Name: Chashme Buddoor (1981)l

ह्याचे संगीत आणि शब्द खूप छान आहे थोडेसे sad आहे पण 


 

Thursday, April 23, 2020

😝Lockdown रेसिपीज

सध्या लॉक डाउन सुरु आहेच लॉक डाउन साठी काही एकदम सोप्या पाक कृती देतेय(आळशी तसेच बिझी लोकांसाठी)
सगळ्यांची फोडणी एकच आहे फक्त मुख्य घटक वेगवेगळे
फोडणीचे साहित्य :-(सर्व साहित्य आपापल्या चव,डाएट आणि आपल्या भागातील किराणामालाच्या उपलब्धतेनुसार नुसार)
प्रमाण मुद्दामच दिले नाहीये-अंदाजपंचे

१. तूप

२.जिरे

३.हळद

४. तिखट

५.धने पावडर

६. गोडा  मसाला (फक्त मुगाच्या खिचडीसाठी)

७. कांदालसून मसाला

८.कांदे

९.टोमॅटो

१०.कसुरी मेथी (थोडी कडवट चव येते चालत असल्यास घालणे)

११.शेझवान चटणी/मसाला पावडर (ह्याची चव कधी लागते कधी नाही ,आवडत असल्यास घालणे शक्यतो मुख्य घटक घातल्यावर वरून घालणे फोडणीत नाही )

तर आता  गॅसच्या मंद आचेवर ह्या वरच्या सर्व साहित्याची फोडणी करायची आणि खालील variations try करायची

मीठ आणि साखर चवीनुसार मुख्य पदार्थ घातल्यावर घालायचे.

१. शेवयाचा उपमा -

घटक पदार्थ- bambino /पतंजली  च्या vermiceli म्हणून मिळणाऱ्या शेवया

Image result for bambino vermicelliImage result for patanjali vermicelli








कृती - ह्यात तव्यावर ह्या शेवया आधी भाजून घ्यायच्या थोड्याशा .

आणि मग वरच्या फोडणीत घालून परतून पाणी घालून,मीठ साखर घालून ,१५-२० मिनिटे माध्यम/मंद आचेवर शिजवायच्या.
पाणी आपल्याला कसा उपमा हवा आहे त्यावर. Chinese नूडल्स चा फील हवा असेल तर जास्त नाहीतर नेहमीसारखे.

एक फसलेले variation-मी ताकात करायचा प्रयत्न केला होता पण ते आंबट लागले 😝-आपापल्या रिस्कवर try करावे .



शेवयाचा उपमा (बाजूला भडंग आणि लोणचे)


२.दलिया आणि मुगाची खिचडी -

घटक पदार्थ-
दलिया (सिद्धकलाचा पण मिळतो एक भाजलेला),मुगाची डाळ

Patanjali Pushtahar Dalia 500 gm - Buy OnlinePatanjali Dalia, 500g: Amazon.in: Grocery & Gourmet Foods

कृती- ह्यात जास्त काही नाही फक्त फोडणीत मुगाची डाळ आधी परतायची दोन्ही एकदम घातले तरी चालते.
generally बरेच जण दलिया कुकर मध्ये शिजवून मग फोडणी करतात मी एकदमच केले फक्त अर्धा तासाच्या आसपास शिजवायचे ह्यात कांदा टोमॅटो घातले नव्हते



३..मुगाच्या डाळीची खिचडी-
घटक पदार्थ-मुगाची डाळ आणि तांदूळ
कृती-ह्यात काही सांगण्यासारखे नाही 😄😄😄
डाळ तांदूळ भिजवून घ्यायचे आणि फोडणीत शिजवायचे २०-२५ मिनिटे
मी ह्यात कांदा टोमॅटो आणि दालचिनी घालून वेगळेपणाचा प्रयत्न केला पण चवीत काही जास्त फरक पडला  नाही

आता lockdown ड्रिंक -बर्फाचा गोळा 😄😄😄

घटक- jalani आम पन्हे पावडर ,पाणी
Jalani Pudina Aam Panna, 40g Pouch: Amazon.in

कृती-एक ग्लास पाण्यात वरचे एक पाऊच घालून ढवळून  फ्रीझ मध्ये अर्धा तास ठेवायचे
थंडगार सरबत आणि निम्मा बर्फाचा गोळा  असे बनते (असेच jalani च्या निंबू पावडर चे पण केले पण ते इतके खास नाहो होत
steelchya भांड्यात ठेवल्याने असा आकार आलाय

(घटक पदार्थांचे फोटो google वरून साभार )

 







 Happy Lockdown stay safe happy & healthy at home and lets pray to end this panic situation soon.