nocopy

Saturday, April 19, 2014

रवा डोसा पण वेगळा !


बऱ्याच दिवसात बिझी असल्यामुळे आणि जवळ कुठलीही वेगळी कृती नसल्यामुळे काहीच  लिहिले नाहीये
:-(
अशीच मावशीकडे गेले होते तेव्हा तिथे एक डोसा नुसताच खाल्ला तो मस्त लागला म्हणून त्याची कृती मावशीला विचारून इथे लिहितेय.

साहित्य: १.  एक वाटी बारीक रवा
              २.  एक वाटी मैदा  (diet बद्दल जागरूक असलेल्यांनी मैद्याऐवजी तांदळाचे पीठ वापरले तरी चालेल)
              ३. २-३ कांदे किसून
             ४.  ताक
             ५. मीठ , साखर चवीनुसार
              फोडणीसाठी - जिरे, तूप,३-४ मिरच्या बारीक चिरून

कृती :

१. रवा + मैदा/ तांदळाचे पीठ  ताकात भिजवून डोशासार्खेच सरबरीत मिश्रण करा आणि ते
 साधारण ६-८ तास ठेवा ( रात्री भिजत घालून सकाळपर्यंत ठेवा किंवा मग सकाळी भिजत घालून संध्याकाळी करा ) ते तितका जास्त वेळ भिजेल तेवढे ते आंबेल
२. सकाळी / ६-८ तासांनी ते काढून त्यात किसलेला कांदा आणि चवीपुरते मीठ -साखर घालून मिश्रण चांगले एकजीव करा घाला
३. साधारण ३-४ चमचे तूप गरम करून त्यात जिरे आणि मिरच्या घालून खमंग फोडणी करा  फोडणी मिश्रणात घालून मिश्रण साधारण ५-१० मिनटे ठेवा


४. आता ह्या मिश्रणाचे नेहमी घालतो त्याच  पद्धतीने डोसे/ धिरडी नॉन स्टिक pan  वर घाला
नॉन स्टिक तवा असेल तर बाजूने तेल सोडण्याची पण गरज नाही ते अलगद निघून येतात झाल्यावर ! :-)


झाल्यावर गरम गरम खा

मिश्रणालाच फोडणी दिल्याने हे नुसते खाल्ले तरी मस्त लागते बरोबर चटणी / सॉस नसले तरी चालते


टीप:
१. तांदळाचे पीठ वापरले तर जास्त कुरकुरीत होतात
२. फोडणी आपण नेहमीची पण करू शकतो पण हि जास्त चांगली लागते
३. वरच्या फोडणीत कढीपत्ता पण वापरू शकतो
४. ताक नसले तर पाण्यात भिजवले तरी चालेल पण मग आंबवल्याची  चव येणार नाही

माहितीचा  स्त्रोत: माझी मावशी आणि आई

No comments:

Post a Comment