nocopy

Sunday, May 17, 2020

स्वैपाकातले प्रयोग-दलिया बिर्याणी

आज रविवार काहीतरी वेगळे करायचे होते पण घरात काहीच नव्हते आणि दुकाने पण बंद. फ्रिज मध्ये असाच एवरेस्ट शाही बिर्याणी मसाला सापडला पाकिटावरची कृती आणि उपलब्ध साहित्याचा मेळ बसत नव्हता
मग असेच दलिया ला हा मसाला वापरून बघण्याचे ठरवले आणि करून पहिले बऱ्यापैकी जमली
कसुरी मेथी चे मोठे पाकीट आणल्यामुळे आजकाल प्रत्येक पदार्थात घातली जाते थोडी कडवट चव येते पण ह्या रेसिपीला नाही आली कदाचित टोमॅटो सॉस घातल्यामुळे असेल
साहित्य
१. दोन वाट्या दलिया
२. एक कांदा चिरून
३. दोन चमचे दही (चवीनुसार )
४. एवरेस्ट शाही बिर्याणी मसाला किंवा कुठलाही बिर्याणी मसाला एक चमचा (टेबलस्पून )
५. टोमॅटो प्युरी /टोमॅटो सॉस/टोमॅटो ketchup  ३ चमचे
६. मोहरी-जिरे -एक टीस्पून
७. हळद-तिखट -एक टीस्पून
८. मीठ चवीनुसार
९. चार चमचे तेल
१०. कसुरी मेथी एक चमचा (ऐच्छिक  )

कृती -
१. दलिया दोनदा धुऊन बाजूला ठेवून द्यायचा ५-१० मिनिटे
२. कांदा चिरून घ्यायचा
३. तेल तापवून हिंग,जिरे ,हळद ,तिखट घालून फोडणी करायची
४. कांदा आणि टोमॅटो प्युरी/टोमॅटो सॉस घालून तेल सुटेपर्यंत परतायचे कसुरी मेथी हवी असेल तर घालायची
५. त्यात दही आणि बिर्याणी मसाला घालून ४-५मिनिटे परतायचे
६. त्यात दलिया घालायचा मीठ आणि पाणी घालून साधारण २०-२५ मिनिटे झाकणावर पाणी घालून शिजवायचे
७. हा दलिया कूकर मधून काढला नसल्यामुळे जास्त वेळ माध्यम/मंद आचेवर शिजवावा लागतो

पारंपरिक बिर्याणीत भाज्या अजून बऱ्याच जास्त असतात तसेच शिजलेल्या बासमती भातावर वर परतलेले मिश्रण घालून हलवून मिसळून घ्यायचे आणि अजून बरेच काय काय असते वर बिर्याणी मसाला घातल्यामुळे दलिया बिर्याणी असे नामकरण करण्याचे धाडस केले आहे  

Saturday, May 9, 2020

आंबा कलाकंद

घरात एकच आंबा उरला होता त्याचे काहीतरी प्रयोग करावे असे सारखे मनात येत होते आंबा खीर,शिरा ह्यासाठी सुकामेवा आणि रवा नव्हता आंबा दलिया शिरा/खीर करावी असे पण वाटत होते गूगल केले तर त्याच्या ठिकठिकाणच्या पाककृती वाचून एकतर आंब्याचा रव्याचा शिरा किंवा साधा दलिया शिरा/खीर अशी माहिती मिळत होती आणि इंग्लिश मध्ये काही ठिकाणी आंबा दलिया खीर/शिरा माहिती मिळाली ती  वाचून तेवढे सगळे करण्याचा पेशन्स नव्हता स्वतःहून try करायचे म्हणाले तर मागच्यासारखे फसायला नको म्हणून हात चालत नव्हते आंबा तसाच खाऊन संपवला जाणार बहुधा अशी तयारी केली होती अशातच दूध नासले
आता त्याचे दही/पनीर/कलाकंद ह्यातले  काहीतरी करणे भाग होते कलाकंद मागच्याच आठवड्यात झाला होता
तरी पण बनवायला सोपा (वेळखाऊ असला तरी ) तोच एक option होता
थोडेसे कंटाळूनच दुधातले पाणी काढून टाकले फक्त घट्ट नासकवणी दूध ठेवले गॅस वर साखर आणि वेलदोड्याचे दोन दाणे /पाकळ्या घातल्या आणि ढवळायला लागले अचानकच त्या आंब्याचा विचार आला आणि करून पाहूया म्हटले मग काय एकीकडे गॅस वर कलाकंद मंद आचेवर ठेवलाच होता एकीकडे तो मध्यम आकाराचा आंबा पिळून त्याचा रस काढला थोडासा चमच्याने सारखा केला आणि गॅसवर ठेवलेल्या कलाकंदात  दिला घालून साधारण १५-२० मिनटे आटवले आणि झाला मँगो कलाकंद तयार !
खाताना थोडीशी बर्फीसारखी चव लागली आज गरम खाल्ला उद्या फ्रीज्ड version खाऊन बघू
हे बनवून खाऊन झाल्यावर परत गूगल केले (हाताला  चाळा )तर ह्याच्या पण बऱ्याच फॅन्सी आणि सजवलेल्या कलाकृती मिळाल्या आणि कलाकंद हा मूळचा राजस्थानी पदार्थ आहे हि माहिती पण मिळाली  असो
नमनाला घडाभर तेल झाले आहे आता कलाकंद करूया
आंबा कलाकंद
साहित्य -
१. अर्धा लिटर नासलेले  नासकवणी दूध (पाणी काढून टाकायचे )
२. चार चमचे साखर किंवा चवीनुसार
३. दोन वेलदोड्याच्या पाकळ्या सोलून
४. एका माध्यम/छोट्या आंब्याचा रस

कृती -
१. नासलेले दूध मंद आचेवर ठेवून त्यात साखर आणि वेलदोडा घालून ढवळायचे
२. साधारण ५-७ मिनिटे ते दूध आटवत ठेवायचे
३. एकीकडे आंबा पिळून त्याचा रस काढायचा
४. आंब्याचा रस दुधात घालून हलवायचे
५. १५-२०मिनिटे ठेवायचे मध्ये मध्ये हलवत राहायचे
६. साधारण घट्ट आणि व्यवस्थित आटून (नेहमीच्या कलाकंदाप्रमाणे) झाला कि गॅस बंद करायचा आणि खायचा

 

Thursday, May 7, 2020

shinchan :एक उत्तम स्ट्रेस बस्टर

ShinChan | Sinchan cartoon

सध्या लॉकडाऊनमुळे टीव्ही बघण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे घरून काम करून आणि बाकीची कामे, फोनाफोनी करून झाल्यावर तेवढाच विरंगुळा उरतो टीव्ही सोडून करण्यासारखे खूप आहे हे कळते तरी वळत नाही असो
पण सारख्या न्यूज चॅनेलवरच्या करोनाच्या घाबरवणाऱ्या बातम्या,सासू सुनांच्या कौटुंबिक भांडणाच्या अमरत्व लाभलेल्या सिरिअल्स ,त्यातच पौराणिक देवादिकांच्या अमरचित्रकथा ,तेच ते चित्रपट (उदा. सोनी -सूर्यवंशम ,झी-हम आपके  है कौन ,हम  साथ साथ हे आणि राजश्री production चे सिनेमे ,कलर्स -कारण जोहर चे सिनेमे ) ते संपले कि दक्षिण भारतीय डब केलेले अतर्क्य आणि अचाट सिनेमे ह्यातून बघायला काहीच उरत नाही.
पाककृती चॅनेल्स बघून आपल्याकडे ते सामान नसल्यामुळे फॅन्सी रेसिपी करता न येण्याचे दुःख नको म्हणून त्या बंद आणि वेब सेरीजचे प्रोमोज बघूनच त्याला आपला पास देऊन टाकला होता नाही म्हणायला गाण्याची चॅनेल्स होतीच पण ती पण एका लिमिट नंतर कंटाळवाणी झाली जुन्या विनोदी सिरिअल्स -देख भाई देख,हम पांच इ.पण चालू केल्या आहेत पण त्या बघून हसू यायचे बंद झाले होते कपिल शर्मा आणि चला हवा येऊ द्या मधले ओढून ताणून केलेले आचरट विनोद आणि पंचेस ने हसणेच विसरले होते
अशातच सहजच shinchan बघितले आणि खूपच रिलीफ मिळाला घरचे लहान आहेस का म्हणून ओरडायला लागले तरी पण बघतच राहिले इतक्या वर्षांनी तोच ताजेपणा आणि हसायला मिळाले
एका ५ वर्षांच्या जपानी मुलाचे सहजसुंदर जीवन आणि रेखाटलेले भावविश्व,त्याला पडणारे प्रश्न आणि त्याची त्याने केलेली उकल त्यातून घडणाऱ्या गमतीजमती ह्या सगळ्यामुळे एक वेगळीच भट्टी जमून आलीये
shinchan ,त्याची बहीण हिमवारी,त्यांचे पालक,श्वान मित्र शिरो आणि शाळेचे सोबती ह्या पात्रांवर रेखाटलेली एक धम्माल कार्टून सिरीज म्हणजे shinchan
रोजच्याच जीवनातले साधे प्रसंग घेऊन त्यातून कशी धम्माल विनोद निर्मिती करता येते त्याचे मस्त ऍनिमेशन कम चित्रण आहे
जपानी संस्कृतीचे चित्रण आणि डबिंग voice ओव्हर आर्टिस्ट्स ची मेहनत पण उल्लेखनीय (८०% श्रेय व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट्स चेच आहे खरे तर )
कुतूहल वाटून गूगल केले तर वेगळीच माहिती आली एवढ्या धम्माल विनोदी पात्राची खरी माहिती करुण आहे
शिनोसुक नोहारा नावाच्या एका ५ वर्षीय मुलाने आपल्या बहिणीला वाचवायला प्राण दिले असे काहीसे लिहिले होते दुर्दैवाने दोघेही रोड accident मध्ये गेले त्या धक्क्याने निराश होऊन त्यांच्या आईने (मिस्सीने )त्यांची रेखाटने करायला सुरुवात केली आणि ते असते तर कसे प्रसंग घडले असते असे इमॅजिन करायला देखील ती रेखाटने
shinchan चे जनक Yoshito Usui ह्यांना मिळाली त्याने प्रेरित होऊन त्यांनी हि कार्टून सिरीज बनवली अशी वदंता आहे ह्याबद्दल बरीच मतमतांतरे आहेत (लिंक-https://www.quora.com/What-is-the-real-story-behind-the-character-Shin-chan)
https://en.wikipedia.org/wiki/Crayon_Shin-chan ह्या लिंकवर shinchan सिरीजची माहिती मिळते
ह्या लिंकवर वरील गोष्टीचा उल्लेख नसल्यामुळे ती वदंताच मानवी लागते
तसेच भारतीय पालकांनी shinchan बद्दल तक्रार केल्याची पण रंजक माहिती मिळाली shinchan chi उद्धटता आपल्या संस्कृतीशी मिळत नसल्याने आणि ते बघून मुले बिघडत असल्याने shinchan चे बरेच भारतीयीकरण करण्यात आले (जसे कि अल्कोहोल च्या जागी juice आणि काही सीन्स सेन्सॉर करण्यात आले )
मी पूर्वी बघितलेले shinchan आणि आत्ताचे shinchan ह्यात फरक जाणवतो तरी पण विनोद उणावत नाही
पण सौम्य केल्याने चांगले वाटते इतकेच

लॉकडाऊन चालू होण्याआधी पण जेव्हा ऑफिस मधून आल्यावर बघायचे तेव्हा एकदम ताणरहित फ्रेश झाल्यासारखे वाटायचे बाकी कार्टून्स कधीच बघितली नाहीत सध्या बघायचा प्रयत्न करते पण नाहीच आवडत shinchan शी जसे कनेक्ट होता येते तसे हल्लीचे कुठलेच कार्टून वाटत नाहीये (काही काहींची थिम चांगली असूनदेखील बघावीशी वाटत नाहीत)
पूर्वीची लहानपणीची आत्ता relate होत नाही फक्त shinchan च कालातीत वयातीत राहिलाय


अजून कोणी आहे का shinchan आवडणारे?

अवांतर - मस्ती चॅनेल वर अन्नू कपूरचा गोल्डन इरा विथ अन्नू कपूर हा कार्यक्रम पण चांगला असतो जुन्या गाण्यांसोबत गीतकार,संगीतकार आणि गायक ,नटांचे वेगवेगळे किस्से पण सांगतो

(फोटो गूगल वरून साभार )