nocopy

Saturday, April 19, 2014

रवा डोसा पण वेगळा !


बऱ्याच दिवसात बिझी असल्यामुळे आणि जवळ कुठलीही वेगळी कृती नसल्यामुळे काहीच  लिहिले नाहीये
:-(
अशीच मावशीकडे गेले होते तेव्हा तिथे एक डोसा नुसताच खाल्ला तो मस्त लागला म्हणून त्याची कृती मावशीला विचारून इथे लिहितेय.

साहित्य: १.  एक वाटी बारीक रवा
              २.  एक वाटी मैदा  (diet बद्दल जागरूक असलेल्यांनी मैद्याऐवजी तांदळाचे पीठ वापरले तरी चालेल)
              ३. २-३ कांदे किसून
             ४.  ताक
             ५. मीठ , साखर चवीनुसार
              फोडणीसाठी - जिरे, तूप,३-४ मिरच्या बारीक चिरून

कृती :

१. रवा + मैदा/ तांदळाचे पीठ  ताकात भिजवून डोशासार्खेच सरबरीत मिश्रण करा आणि ते
 साधारण ६-८ तास ठेवा ( रात्री भिजत घालून सकाळपर्यंत ठेवा किंवा मग सकाळी भिजत घालून संध्याकाळी करा ) ते तितका जास्त वेळ भिजेल तेवढे ते आंबेल
२. सकाळी / ६-८ तासांनी ते काढून त्यात किसलेला कांदा आणि चवीपुरते मीठ -साखर घालून मिश्रण चांगले एकजीव करा घाला
३. साधारण ३-४ चमचे तूप गरम करून त्यात जिरे आणि मिरच्या घालून खमंग फोडणी करा  फोडणी मिश्रणात घालून मिश्रण साधारण ५-१० मिनटे ठेवा


४. आता ह्या मिश्रणाचे नेहमी घालतो त्याच  पद्धतीने डोसे/ धिरडी नॉन स्टिक pan  वर घाला
नॉन स्टिक तवा असेल तर बाजूने तेल सोडण्याची पण गरज नाही ते अलगद निघून येतात झाल्यावर ! :-)


झाल्यावर गरम गरम खा

मिश्रणालाच फोडणी दिल्याने हे नुसते खाल्ले तरी मस्त लागते बरोबर चटणी / सॉस नसले तरी चालते


टीप:
१. तांदळाचे पीठ वापरले तर जास्त कुरकुरीत होतात
२. फोडणी आपण नेहमीची पण करू शकतो पण हि जास्त चांगली लागते
३. वरच्या फोडणीत कढीपत्ता पण वापरू शकतो
४. ताक नसले तर पाण्यात भिजवले तरी चालेल पण मग आंबवल्याची  चव येणार नाही

माहितीचा  स्त्रोत: माझी मावशी आणि आई

Thursday, April 10, 2014

नाशिक सप्तशृंगी गड ट्रीप : एक अनुभव



नुकतेच  नाशिक सप्तशृंगी गडाची ट्रीप केली
पुण्याहून राज्य सरकारी परिवहन मंडळाच्या बस( २* २ एशियाड ) ने नाशिक ला गेलो
नाशिकहून साध्या बसने (  S T  चा  लाल डबा! :-)) आधी नांदुरी मग तिथून सप्तशृंगी गडावर गेलो

गडावर सोयी सुविधांचा अभावच आहे
भक्तनिवास आहे पण त्यांची  निट  देखभाल होत नाही हे लगेच कळून येत होते खोल्या स्वछ नव्हत्या तसेच त्याच्या आवारातच (passage मध्ये)लोक आपापल्या पथाऱ्या पसरून झोपत होते
प्रसादाच्या  जेवणाची सोय त्यामानाने बरी होती
( १५ रु. एका ताटासाठी)
सर्वत्र अस्वच्छता,धुळीचे साम्राज्य आणि पचापचा थुंकणारे लोक यांचा अक्षरश: वैताग येत होता
तिथले stalls पाहून  'देऊळ ' picture ची आठवण झाली

शक्य असेल तर गडावर मुक्काम न करता नाशिकला मुक्काम करून तिथून देवी दर्शनापुरती  गडाची ट्रीप करणे जास्त सोयीस्कर आहे

गड चढताना होणाऱ्या भोवतालच्या निसर्ग दर्शनामुळे आणि मग देवीच्या  दर्शनामुळे  ह्या गोष्टींचा तात्पुरता का होईना विसर पडला आदिशक्तीचे दर्शन घेऊन मन तृप्त झाले

गडावरून उतरून  साध्या बसने नाशिक मग तिथून त्र्यंबकेश्वरला गेलो
ह्या दोन्ही प्रवासात खिडकीतून बाहेर थुंकणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे ह्या थाटात वावरणारे भारतीय लोक ! त्यात बसचे  वाहक चालक पण! (मी पुढच्या seat वर बसलेले  असल्यामुळे मला हे फारच प्रकर्षाने दिसत होते)
का आपण ह्या देशात जन्माला आलो  असे  वाटत होते

त्र्यंबकेश्वर ला पोचल्यावर तिथे शेगाव संस्थानच्या भक्तनिवासात राहिलो ते मात्र खूपच छान आहे
तिथे त्यांचे सुरेख मंदिर पण आहे. ( मंदिरापासून १ km अन्तर)
त्यांचे भोजन आणि अल्पोपहार गृह पण आहे त्तिथे जेवण आणि नाष्टा -चहापाण्याची सोय कमी दरात आणि चांगली आहे अर्थातच वेळ मर्यादा आहे
( ३५ रु. थाळी आणि रात्री १० नंतर गेले तर कढी भाताचा प्रसाद विनामूल्य )
त्र्यम्बकेश्वारला जास्त चांगले वाटले  (सुट्ट्या सुरु व्हायच्या आहेत अजून म्हणून थोडी बजबजपुरी कमी होती)

त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन परत पुण्यात अशी छोटेखानी सहल पार पडली.

पुण्यात येताना खाजगी बसने आलो त्यामुळे थोडी गैरसोय झाली
राज्य सरकारी परिवहन मंडळाच्या बसची सोय त्यापेक्षा  चांगली आहे ( तिकीटाची किंमत पण जास्त आहे ना खाजगीपेक्षा ! :-))

आपण जरा routine मधून change आणि ताजेतवाने होण्यासाठी म्हणून प्रवासाला जातो त्यात पण देवाच्या ठिकाणी जाताना मनात श्रद्धा आणि भक्तीभाव ठेवून जातो पण तिथेच अशा गोष्टी पाहून मन खट्टू होते
आणि श्रद्धा आणि भक्तिभावाची जागा वैताग आणि चिडचीडीने घेतली जाते आपोआपच.

अध्यात्म हे असेच कष्टसाध्य आहे हि आपली लाडकी भारतीय मानसिकता त्यामागे आहे असे वाटत राहिले .

हि मानसिकता लवकर बदलो आणि सर्व देवस्थान च्या ठिकाणी किमान स्वच्छता आणि पावित्र्य जपले जावो हीच त्या देवाला प्रार्थना.

हे घ्या फोटो…
 कॅमेरा : sony ericsson cybershot K ५५० i  २ MP
 गजानन महाराज शेगावच्या भक्तनिवासचे मंदिर
खालचे सगळे सप्तशृंगी गडाचे